लाखो एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला, तर विरोध करायचा नाही का ? : विनायक राऊत

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 28, 2024 15:37 PM
views 219  views

देवगड : इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत म्हणाले, सिडकोच्या माध्यमातून परप्रांतिय भूमाफियांच्या घश्यामध्ये कोकण भूमी घालण्याचे कपट कारस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. लाखो एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला, तर विरोध करायचा नाही का? सिडकोच्या आक्रमणाला विरोध करायचा नाही का? यासाठी आमदार वैभव नाईक, राजन साळवी हे आपल्यासोबत उभे राहिले. कपट कारस्थानाने कोकण भूमी हडप करायला निघालात तर सिडकोच्या एकाही अधिकाऱ्याला कोकणच्या भूमीवर पाय ठेऊ देणार नाही, असे आम्ही महाराष्ट्राच्या महसूलमंत्र्यांना ठणकावून सांगितल्याचे राऊत म्हणाले.

वैभव नाईक म्हणाले, नारायण राणेंनी गेल्या ३० वर्षात काय काम केले, हे विचारण्याचीसुद्धा वेळ आली आहे. आमदार नीतेश राणे हेदेखील टीका करण्याचेच काम करीत आहेत. देवगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे एकदिलाने काम करून विनायक राऊत यांना या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. सतीश सावंत, सुशांत नाईक, संदीप कदम, स्वप्नील धुरी, किरण टेंबुलकर, गणेश गावकर, अॅड. प्रसाद करंदीकर, सुशांत नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.