
कणकवली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत चौथी मधून 12 आणि सातवी मधून 10 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे,उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा. नीलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत, सल्लागार डी.पी. तानावडे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई आदींनी अभिनंदन केले आहे.










