
मायकल डिसोजांकडून दीड महिना जागेचा वापर
सावंतवाडी : ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी संस्था आहे. त्यामुळे त्यांना नगरपरिषदेकडून भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी १५ दिवसांचे भाडे भरले असून दीड महिना वापर केलेला आहे. एकारुमची मागणी करुन तीन रूम वापरत आहेत. नगरपरिषदेच उत्पन्न वाढविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. तर नगराध्यक्षा म्हणून माझ्यावर टीका न करता मायकल डिसोजा राजघराण्यावर आरोप करत आहेत. ही बाब योग्य नसून मानहानीचा दावा दाखल करण्याचाही आमचा विचार आहे, असे मत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त करत डिसोजांच्या आरोपांवर पलटवार केला. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहीनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर , सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा म्हणाल्या, माझ्यावर काही आरोप करण्यात आले असून दरवेळी आरोपांना आम्ही उत्तर देत नाही. काम करत राहणं आमचं उद्दीष्ट आहे. ग्रो-बीग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जिमखाना येथे सेंटर सुरू होते. ते सांस्कृतिक, वस्तू संग्रहालय असल्याने काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. यावेळी मुंबई विद्यापीठ व ग्रो बी टेक्नॉलॉजीकडून होणार कामकाज बघण्यासाठी तिथे गेलो. यावेळी काही चुकीच्या गोष्टी दिसून आल्या. १५ दिवसांसाठी ५० हजार व जीएसटीसह ९ हजार दराने आम्ही त्यांना जागा दिली होती. याबाबत काउन्सिलची बैठक देखील होणार होती. आज दिड महिना झाला ही कंपनी तिथेच आहे. एका रूमची परवानगी घेऊन तीन रूमचा वापर केला जात आहे. मात्र, आम्ही विचारलं तेव्हा खोटी माहिती दिली गेली. बाथरूम वापरायचा कोणताही विषय नव्हता. तिसऱ्या रूममध्ये त्यांची मूल जेवत होती. त्यांनी प्रशासनाशी बोलणं आवश्यक होतं. मात्र, तसं झालेलं नाही. नगरपरिषदेच्या इमारतीचा वापर कशासाठी होतो ? यावर लक्ष ठेवणे ही नगराध्यक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. याबाबत विचारलं म्हणून ते राजघराण्यावर टीका करत आहेत. आमच्या परिवारातील लोकांवर आरोप करत आहेत. राजकारणात येताना लोकांच काम करण्यासाठी सावंतवाडीचा विकास करण्यासाठी मी आले आहे असं त्या म्हणाल्या.
तसेच कोणवरही मी वैयक्तिक बोलणार नाही. नगरपरिषदेच्या इमारतीत कोणत्या गोष्टी होत असतील तर त्यावर माझं लक्ष आहे. ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी आहे. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी हाच आमचा हेतू आहे. टाळ ठोकण्याचा कोणाताही विषय नाही. तिथली दार ही काचेची आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही याबाबत करणार आहोत. अनेकांनी आमच्यावर आरोप केलेत. मात्र, त्यात सत्य असेल तर त्याचे पुरावे पुढे घेऊन यावे असंही आव्हान त्यांनी दिले. तसेच १५ दिवसांसाठी त्यांनी रूम मागितली होती. त्याचा करार झालेला आहे. ५० हजार भाड अन् जीसटी ९ हजार हे प्रशासनाकडून ठरल होत. आज दीड महिना झाला असून त्याबाबत विचारले असता त्यांनी टीका केली आहे. १ महिन्याचे भाडे दिलेलं नाही, १५ दिवसांच भाड भरलेलं आहे. ती खासगी कंपनी असल्याने भाडे आकारणी केली आहे. रोजगारासाठी त्यांनी मागणी केल्याने प्रशासनाकडून त्यांना भाडे ठरवून दिले होते. मुंबई विद्यापीठ मी नगराध्यक्ष होण्यापूर्वी आले होते. त्याबाबत वरिष्ठांनी निर्णय घेतले होते. माझा लक्ष नगरपरिषदेच उत्पन्न वाढविण्यासाठी आहे. याबाबत ठराव करून आम्ही पुढील भुमिका घेणार आहोत.
दरम्यान, शहरात विकासकाम होताना काही अडचणी येतात. मात्र, आमची टीम सज्ज आहे. लोकांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे होणारी टिका ही नाहक आहे. मल्टिस्पेशालीटीबाबत ते बोलले आहेत. मात्र, अनेक बैठका मुंबईत झालेल्या आहेत. राजघराण्याने अनेक जागा देखील दिलेल्या आहेत. मी नगराध्यक्ष असताना माझावर टीका करावी. मात्र, राजघराण्यावर का बोलल जात ? माझा कुटुंबावर का बोलता ? त्यामुळे मानहानीचा दावा दाखल करण्याचाही आमचा विचार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.










