मला दिलेली साथ मी आयुष्यभर जपेल ! ; युवा उद्योजक विशाल परब यांची ग्वाही !

कविलकाटेत 'कोकणचा महाडांन्सर' स्पर्धेचे केले उद्घाटन ; कोकणसाद LIVE मीडिया पार्टनर
Edited by: भरत केसरकर
Published on: January 24, 2023 12:00 PM
views 207  views

कुडाळ : आज कविलकाटेसारख्या छोट्याशा गावात एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मनस्वी आनंद झाला आहे, मी आपल्यातीलच एक सामान्य माणूस आहे, आज या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट असून साईनाथ जळवी आणि त्यांच्या साथीदारांनी घेतलेला उपक्रम पूर्ण व्हावा, यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही जशी मला साथ दिली, ती अशीच कायम ठेवा,  आयुष्यभर मी तुम्हाला जपणार आहे, कविलकाटे आणि परिसराच्या विकासासाठी मी आणि माझे विशाल सेवा फाऊंडेशन कायमस्वरूपी कटिबद्ध राहिल, मला फक्त साथ द्या, मी तुम्हाला देशपातळीवर नेण्यासाठी हवे ते सहकार्य करीन !, असे भावनिक आवाहन युवा उद्योजक तथा भाजपचे युवा नेते, विशाल फाऊंडेशनचे सर्वेसर्वा विशाल परब यांनी कविलकाटे येथे आयोजित 'कोकणचा महाडांन्सर' या स्पर्धेचे उद्घाटन करताना सांगितले.

कुडाळ - कविलकाटे येथील श्री सिद्धी गणपती मंदिराच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी सायंकाळी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कविलकाटे ग्रामसेवा संघ निर्मित आणि साई जळवी फिल्म प्रस्तुत 'कोकणचा महाडांन्सर' ही भव्य सोलो आणि जोडी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथमच कुडाळ शहरात ही आंतरराष्ट्रीय दर्जाची नृत्य स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी व्यासपीठावर युवा उद्योजक व भाजपचे युवा नेते विशाल परब, कोकणसादचे उपसंपादक प्रा. रुपेश पाटील, पत्रकार शेखर सामंत, नगराध्यक्ष आफरीन करोल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, उद्योजक संतोष सावंत, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे नूतन अध्यक्ष दीपक नारकर, नगरसेविका ज्योती जळवी, साईनाथ जळवी, राजू जळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी युवा नेते विशाल परब पुढे म्हणाले, माझी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांना विनंती राहील की, आपण फक्त मला साथ द्या, आपल्यासाठी मी हवे ते सहकार्य करेल, युवकांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी माझे पाहिजे ते देण्याची माझी तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले


कोकणसाद LIVE मीडिया पार्टनर

प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या स्पर्धेसाठी कोकणचे नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' ने मीडिया पार्टनर म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल कोकण कला केंद्राचे अध्यक्ष साईनाथ जळवी यांनी 'कोकणसाद LIVE' चे व संपादक सागर चव्हाण यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करत यापुढेही  'कोकणसाद LIVE'  सातत्याने आमच्या उपक्रमात सहभागी राहील, असेही जळवी म्हणाले.