
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा विषय रेल्वे मंत्र्यासह बोलेन व तो विषय लवकर पूर्ण करेन. केंद्रीय रेल्वेमंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी देखील लक्ष वेधेन असं मत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांनी भुमिपूजन करूनही टर्मिनसच्या रखडलेल्या विषयाबाबत विचारल असता खास.राणे बोलत होते.