
सावंतवाडी : मी आमदारकीच लढवणार आहे. मी खासदारकीसाठी इच्छुक नाही. त्यामुळे कोणी अफवा पसरवत असतील की केसरकर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे तर त्यावर विश्वास ठेवू नये अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
सावंतवाडी मतदार संघ सर्वांत उत्कृष्ट असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील काही विकासकामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा आमदारकी लढवणार आहे. खऱ्या अर्थानं आता या विकास कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी आमदारकीच लढवणार आहे. तर या लोकसभा मतदार संघात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.