
सावंतवाडी : मी महायुतीचा उमेदवार आहे. लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आहे आणि लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असे विधान शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. भाजपचे सावंतवाडी विधानसभा समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी केसरकर यांच्यावर टीका केली होती. मी शंभर टक्के दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणांच्या बाबतीत नक्कीच मी प्रदर्शन मांडेण असे वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता केसरकर म्हणाले, मी महायुतीचा उमेदवार आहे लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आहे. अशा प्रवृत्तींशी माझा काहीही संबंध नाही.