
कुडाळ : मी स्वतः शहरातुन आलो आहे, तरी सुध्दा मला शेतीची आवड आहे. आपली या ठिकाणची शेती पाहुन मलाही वाटत कि कुठे तरी शेती घेवून छान पैकी शेती करावी. तुमचे असे उपक्रम पाहुन शेतीचा अनुभव आम्हीही घेतो असे जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. कुडाळ पंचायत समितीच्या वतीने ‘चिखलधुणी’ हा उपक्रम कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (अणाव) ग्रामपंचायत येथे आयोजित केला.यावेळी सीईओ बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, परिविक्षाधिन अधिकारी करिष्मा नायर, परिविक्षाधिन अधिकारी विशाल खत्री, अतिरीक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं.) विशाल तनपुरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ( ग्रामीण पाणी पुरवठा) विनायक ठाकुर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण,माजी जि.प.सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, भुपतसेन सावंत, जयभारत पालव आदी उपस्थित होते.










