सावंतवाडीत उद्या ५७ उपोषण !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 13:01 PM
views 26  views

सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यात तब्बल ५७ उपोषण होणार आहेत. शासकीय कार्यालयांबाहेर विविध मागण्यांसाठी ही वैयक्तिक व सामूहिक उपोषण होणार आहेत.

तर सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे टर्मिनससाठी व सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे.