'त्या' ग्रामसेविकेवर कारवाई न झाल्यामुळे भानुदास तावडे करणार उपोषण

१० जुलैला पं.स.समोर उपोषण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 02, 2024 13:14 PM
views 450  views

वैभववाडी : शासकीय सेवेसाठी अपात्र असणा-या  ग्रामसेवक सविता काळे यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी या मागणीसाठी भानुदास तावडे यांनी १० जुलैला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. यापुर्वी श्री.तावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यकार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने श्री.तावडे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

    सध्या ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या सौ.काळे या शासकीय सेवेस पात्र नव्हत्या. लहान कुटुंबाबाबत असलेल्या शासन निर्णय डावलुन त्या शासकीय सेवेत भरती झालेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आपण १३ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याशिवाय जिल्हा परिषद,पंचायत समितीस्तरावर देखील यासंदर्भात तक्रार केली होती.परंतु परंतु आजमितीस प्रशासनाकडुन या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. लहान कुटुंबाबाबत असलेला शासन निर्णय डावलून भरती झालेल्या ग्रामसेवक सौ.काळेवर कारवाई व्हावी अशी आपली मागणी असुन ही कारवाई न झाल्यास येत्या १० जुलैला येथील पंचायत समितीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा श्री.तावडे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.