
देवगड : विजयदुर्ग खाडीमध्ये नौकानयन मार्ग सुखकर करण्याकरता शासन तसे प्रशासनाच्या स्तरावर निविदा काढण्यात आली तसेच रेती उत्खनन करण्याकरता संबंधित मक्तेदारास परवानगी देण्यात आली होती. संबंधित मक्तेदारानेन गट ताबा घेतलेल्या जागेवर रेती उत्खनन न करता अन्य ठिकाणी रेती उत्खनन केले याचे विरोधात विजयदुर्ग खाडीतील सागवे ते आंबेरी या खाडी पाण्यामध्ये 14 मार्च 10.30 वाजता उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शांताराम भाबल यांनी दिला होता. त्या अनुषंगाने देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन आपल्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही संबंधित विभागामार्फत करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने विजयदुर्ग खाडीपात्रात 14 मार्च रोजी करण्यात आलेले उपोषण स्थगित करीत आहे ,अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भाबल यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे.
संबंधित मक्तेदराने गट ताबा घेतल्या जागे उत्खन न करता अन्य दुसर्या ठिकाणी उत्खनन करत असल्याबाबतचे तक्रार 3 मार्च 2024 या फोटोसह अर्जासोबत जोडण्यात आले होते.तसेच उपोषण घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित खात्याचे अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असे लेखी पत्र रामचंद्र भाबल यांनी 7 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिले होते .त्या अनुषंगाने त्यांनी 14 मार्च रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतला . या उपोषण स्थळी देवगड तहसीलदार यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याशी चर्चा केली व यावर योग्य ती कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात येईल असे सांगितल्याने तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती रामचंद्र भाबल यांनी दिली आहे.