
कणकवली : कणकवली तालुक्यातील कासरल गावच्या ग्रामस्थांनी भाजपमध्ये काही दिवसापूर्वीच प्रवेश केला होता त्यानंतर आता पुन्हा कणकवली कलमठ गावातील मुस्लिम वाडीमधील शिसेनाच्या शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजप आमदार रितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगला येथे भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला पुन्हा धक्का दिला आहे. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है समीर नलावडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देखील दिल्या यावेळी सोनू शेख प्रवीण मोरे, विजय खरात, बबलू शेख, असलम शहा, एजास खान, सय्यद शेख, बाबू कदम, शाहरुख शाह ,सुनील मोरे , सुखदेव वाघमारे, पुंडलिक मुजुकर, सागर नाव्ही,निखिल तांबे, विल्सन फर्नांडिस मुश्रीफ शेख हैदर शहा दानिश खान , वीलायत खान सलमान खान, बाबुल शेख, त्यांच्यासह महिला कार्यकर्ते देखील उपस्थित होत्या यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप मिस्त्री, मिलिंद मिस्त्री राजू गव्हाणकर, इब्राहिम शेख यांच्यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते