शिवसेनेच्या शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

ओम गणेश बंगल्यावर आमदार राणे, नगराध्यक्ष नलावडे यांचा घुमला जयघोष !
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 20, 2022 12:45 PM
views 1180  views

कणकवली : कणकवली कलमठ गावातील मुस्लिम वाडीमधील शिवसेनेच्या शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, समीर नलावडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देखील दिल्या.


यावेळी सोनू शेख, प्रवीण मोरे, विजय खरात, बबलू शेख, असलम शहा, एजास खान, सय्यद शेख, बाबू कदम, शाहरुख शाह, सुनील मोरे, सुखदेव वाघमारे, पुंडलिक मुजुकर, सागर नाव्ही, निखिल तांबे, विल्सन फर्नांडिस, मुश्रीफ शेख, हैदर शहा, दानिश खान, वीलायत खान, सलमान खान, बाबुल शेख, त्यांच्यासह महिला कार्यकर्त्यादेखील उपस्थित होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप मिस्त्री, मिलिंद मिस्त्री राजू गव्हाणकर, इब्राहिम शेख उपस्थित होते.