
देवगड : येथील ग्रामसेवक तालुका संघटनेत महिलाराज पहायला मिळाले. त्या ठिकाणी अध्यक्ष सचिव उपाध्यक्षांसह सदस्य असे सर्वच पदाधिकारी महिला नेमण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे निवड प्रक्रिया करण्यात आली आहे. यात तालुकाध्यक्षपदाचा मान मधूरा भुजबळ, सचिवपदी श्रध्दा वळंजू तर उपाध्यक्ष प्रांजल शेगडे यांचा समावेश आहे.
ही निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली. यात जाहिर करण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष भाग्यश्री सरोदे, सहसचिव रुमा फड, कोषाध्यक्ष मनिषा पाटील, कायदे विषयक सल्लागार विद्या जाधव, संघटक प्रिती ठोंबरे आदींची निवड करण्यात आली आहे.