दोडामार्गमध्ये पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद...!

Edited by: संदीप देसाई
Published on: June 19, 2023 10:51 AM
views 265  views

दोडामार्ग : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याने लाभार्थी संमेलन मेळावा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रविवारी दोडामार्ग येथील भाजपकडून आयोजित विशेष कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.

दोडामार्ग येथे रविवारी येथील सुशिला हॉल मध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या  मेळाव्यास मार्गदर्शक कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व पाॅडीचेरीचे प्रभारी निर्मल सुराणा, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष चेतन चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी , तालुकाध्यक्ष सुधिर दळवी, राजेंद्र म्हापसेकर , उद्योजक विवेकानंद नाईक, रमेश दळवी, नितीन मणेरीकर, गौरी पार्सेकर, खडपकर, अभिमन्यू कुबल, रत्नकांत कर्पे, सुनील गवस, दाजी नाईक यांसह  तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुरवातीला उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या निवासस्थानी कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व पाॅडीचेरीचे प्रभारी निर्मल सुराणा यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्वागत केलं.