
सावंतवाडी : सिंधुरत्न जॉब फेअर साठी सिंधुदुर्ग - रत्नागिरीतून सहा हजारहून अधिक युवकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यामुळे १२ तारखेला सकाळी सात वाजता जे हजर होणार तसेच त्यांचं रजिस्ट्रेशन जरी नसलं तरी त्यांना आम्ही प्राधान्य देणार, अशी माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज दिली.दरम्यान, युवकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो असल्याच परब यांनी सांगितलं.
यावेळी विशाल परब पुढे बोलताना म्हणाली की, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी सिंधूरत्न जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी युवकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कोणाचे रजिस्ट्रेशन झालं नसली तरी आम्ही त्यांना समाविष्ट करून घेऊ असे, यावेळी स्पष्ट केले. दरम्यान या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हास्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित रहावे असे आवाहन परब यांनी यावेळी केले. तसेच सर्व युवक युवतींनी या कार्यक्रमांना सकाळी सात वाजल्यापासूनच आपली हजेरी लावावी, असे आवाहन देखील परब यांनी यावेळी केले आहे.