१२ वी परीक्षेचा निकाल जाहीर

कोकण विभागाची पुन्हा बाजी | राज्याचा निकाल ९१.८८ टक्के
Edited by:
Published on: May 05, 2025 12:25 PM
views 30  views

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १२ वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा एकूण ९१.८८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (९६.७४%) लागला आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८९.४६%) आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित, खाजगी, पुनर्परिक्षार्थी आणि दिव्यांग अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याचा अर्थ ९१.८८% विद्यार्थी पास झाले आहेत. खाजगी विद्यार्थ्यांमध्ये ३६,१३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २९,८९२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३% आहे.

नियमित विद्यार्थ्यांमध्ये   कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे ९६.७४% आहे. तर, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८९.४६% आहे. यावर्षी मुलांपेक्षा मुलींनी जास्त यश मिळवले आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% आहे, तर मुलांची ८९.५१% आहे. याचा अर्थ, मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% जास्त आहे.