हॉस्पिटल नाका मंडळाचे काम उल्लेखनीय : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई

Edited by:
Published on: November 13, 2023 12:44 PM
views 74  views

वेंगुर्ला : हॉस्पिटल नाका कला - क्रीडा मंडळ, वेंगुर्लेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दीपावली शो टाईम चे आयोजन करण्यात आले. पाच दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 

यावेळी शुभेच्छा देताना हॉस्पिटल नाका मंडळाचे कौतुक करत, वेंगुर्ले शहराला जो सांस्कृतिक वारसा आहे तो टिकवण्याचे काम ह्या मंडळा मार्फत केले जाते याबद्दल अभिनंदन केले. तसेच या मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर सामाजिक उपक्रम घ्यावेत, असे आवाहनही देसाई यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दिनेश तानावडे, विनायक शिरवणकर, शाम कौलगेकर, राजु वजराठकर, मंडळाचे अध्यक्ष अँड. मनिष सातार्डेकर, मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र गावडे, रामचंद्र सावंत,  ज्ञानेश्वर कळेकर, राहुल वेंगुर्लेकर, जयंत सावंत, रुपेश सावंत, प्रफुल्ल सावंत, करण निरवडेकर, सौरभ भोसले, मनिष कळेकर, कौस्तुभ गवस, पुरुषोत्तम मडकईकर, मकरंद होळकर, सिद्धेश मांजरेकर, निखिल शिरोडकर, सचिन मांजरेकर तसेच मंडळाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.