व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान...!

कणकवली तालुका व्यापारी संघाचे आयोजन...! प्रांताधिकारी, तहसीलदारांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा...!
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 09, 2023 10:35 AM
views 434  views

कणकवली  : महिला शक्ती कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून देत

असतानाच आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कणकवली तालुक्यातील महिलांचा कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. या

महिलांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत

उमटवलेला ठसा हा कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड, प्रिया हर्णे, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, राजेश राज्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अशोक करमेळकर विलास कोरगावकर राजन पारकर दादा केणी बंडू खोत संतोष काकडे, नितीन पटेल, दादा कुडतरकर

आदी उपस्थित होते. यावेळी सविता वासुदेव अंधारी,

सुनंदा जयराम नेवगी, मयुरा गणेश कुडाळकर, संजना

संतोष काकडे, स्वाती दिगंबर कोरगावकर, रश्मी रामदास परब, अमिता प्रशांत कुळकर्णी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.