युवा रक्तदाता देव्या सुर्याजींचा सन्मान

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 21:10 PM
views 164  views

सावंतवाडी : प्रवास दत्तमाऊलीचा सोहळा ते वर्षे पूर्तीच्या अंतर्गत दत्त माऊली दशावतार शिक्षण प्रशिक्षण बहूउद्देशीय नाट्य मंडळ सिंधुदुर्ग आयोजित मठ वेंगुर्ले येथील रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रमात युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा कार्यक्रमामध्ये अध्यक्ष बाबा मयेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

रक्तदान चळवळीसह आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे करत असलेल्या कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. यावेळी दत्त माऊली दशावतार शिक्षण प्रशिक्षण बहूउद्देशीय नाट्य मंडळाचे सदस्य उपस्थित होते.