
सिंधुदुर्ग : बारावी परीक्षेत ९५.१७ टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेली कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आयुषी रुपेश भोगटे हिच्या कुडाळ शहरातील निवासस्थानी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन आयुषीच्या दैदिप्यमान यशाबद्दल तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, गुरू गडकर, अमित राणे, नितीन सावंत यासंह आयुषीचे आई वडील व भोगटे कुटुंबिय उपस्थित होते.