अभिनयसम्राट बाबा सावंत यांचा सत्कार

राज्य सांस्कृतिक पुरस्काराचं निमित्त
Edited by:
Published on: January 03, 2026 17:12 PM
views 222  views

सिंधुदुर्ग : आरोलकर दशावतार नाट्य मंडळात आपली दशावतार कलाकार म्हणून कारकीर्द सुरु करून दशावतार कलाक्षेत्रात भाषसंपन्न अभिनयसम्राट म्हणून नावारूपास आलेल्या बाबा सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळालाय. याबद्दल भाऊ आरोलकर यांनी बाबा सावंत यांचा केलेला सत्कारसोबत कंपनीचे हितचिंतक सुधीर धुरी उपस्थित होते.