प्राचार्य यशोधन गवस यांना स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार प्रदान

साहित्य संमेलनात मंत्री नितेश राणेंच्या हस्ते गौरव
Edited by: विनायक गांवस
Published on: March 22, 2025 15:03 PM
views 219  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरीत जेष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न झालं. संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर  संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉ मिलिंद कुलकर्णी, रूजोराय पिंटो, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,दैनिक तरुण भारत संपादक शेखर सामंत आदी उपस्थित होते. 

गेली १८ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य यशोधन गवस कार्यरत आहेत. देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. सारथी फाउंडेशन अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार त्यांना मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भोसले तळीकर प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल भोसले उपस्थित होते. श्री. गवस यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी श्री कंकाळ,कोमसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उषा परब, जिल्हा सचिव विठ्ठल कदम,सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, वृंदा कांबळी, रूजारीओ पिंटो,  जिल्हा सचिव विठ्ठल कदम, कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, ऋतुजा सावंतभोसले, मंगल नाईक जोशी, रामदास पारकर आदी उपस्थित होते.