कोकणच्या आईन्स्टाईनचा सन्मान...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 26, 2024 14:50 PM
views 113  views

सावंतवाडी : कोकणचा आईन्स्टाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय तुळसकर याचा सन्मान नवचेतना युवक संघ पेडणे तर्फे करण्यात आला. दोन्ही हातांनी हार्मोनियम वाजवण्याची कला आणि अतिशय तीष्ण बुद्धिमत्ता ही त्याची ओळख सबंध कोकण प्रांतात तसेच महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तो वेंगुर्ला येथील शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे. जगातील सर्व देशांच्या राजधान्या एकूण 20 देशांची राष्ट्रगीते त्याला माहित आहेत.सामान्य ज्ञान, गणिती ज्ञान खगोलशास्त्र,  रासायनिक विज्ञान मूलद्रव्य इत्यादींची सूक्ष्म माहिती त्याला आहे.1 ते 1111  त्याला पाढे म्हणता येतात. चौरस आणि वर्गमुळ त्याला माहित आहेत.तसेच एकाच वेळी भारत आणि अमेरिका या देशांची राष्ट्रगीते तो  पियानोवर वाजवतो. . संगीतातील हार्मोनियमची त्याने प्रवेशिका प्रथम पर्यंत त्यांनी परीक्षा दिली पण वयो मर्यादेमुळे पुढील परीक्षा त्याला देता येत नाही, पण विशारद  पर्यंत त्याचा अभ्यास पूर्ण आहे.