सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या शिलेदारांचा सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मान

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 14, 2022 14:37 PM
views 179  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना कालावधीत तसेच रक्तदान चळवळीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ३६ कार्यकर्त्यांचा वेंगुर्लेत सन्मान करण्यात आला. माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. अटल प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट व माझा वेंगुर्ला संस्थांच्यावतीने वेंगुर्ले येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोविड काळात वैद्यकीय सेवा बाजाविलेल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रक्तदाते यांचा सत्कार करण्यात आला.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, कार्यवाह किशोर नाचणोलकर यांच्यासह वेंगुर्ले येथील अॅलिस्टर ब्रिटो, महेश राऊळ, सनी रेडकर, रुपाली परब, प्रसाद नाईक, ओरोस येथील साईनाथ आंबेरकर, डॉ.वैभव आईर, निकिता नाईक, कुडाळ येथील कल्पिता साटेलकर, यशवंत गावडे, प्रसाद वारंग, मकरंद नाईक, मंगेश प्रभू, सावंतवाडी येथील बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर, महेश रेमुळकर, एकनाथ चव्हाण, बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर, अक्षय मयेकर, सुनिल गावडे, दोडामार्ग येथील भुषण सावंत, विवेकानंद नाईक, गीतांजली सातार्डेकर, संजय पिळणकर, मालवण येथील दत्ता पिंगुळकर, शिल्पा खोत, प्रा. सुमेधा नाईक, देवगड येथील विजयकुमार जोशी, प्रकाश जाधव, महेश शिरोडकर, उद्धव गोरे, कणकवली येथील अमेय मडव, तन्वी भट, अभिषेक नाडकर्णी, वैभववाडी येथील राजेश पडवळ या रक्तमित्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 



यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, उमा प्रभू, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माझा वेंगुर्ला संस्थेचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, नकुल पार्सेकर, शशांक मराठे, सीमा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.