नगराध्यक्षांचा स्तुत्यउपक्रम.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दिली 90 हजार रुपयांची मानधन

पुतळा समितीकडे धनादेश केला सुपूर्द देऊ शब्द तो पुरा करू याची कणकवली नगराध्यक्षांकडून प्रचीती
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 07, 2023 10:40 AM
views 138  views

कणकवली नगराध्यक्ष पदाचे मानधन कणकवलीतील हायवे मध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी करत 90 हजार रुपयांचे नगराध्यक्षपदाचे सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे व पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुपूर्द केले. या पुतळ्याचे तीन वर्षे स्थलांतर रखडलेले असताना काही महिन्यांपूर्वी स्थलांतरण केल्यानंतर या पुतळ्याचा काही भाग सुशोभीकरण करण्यात आला. तसेच अन्य भागाचे देखील पुतळा समितीकडून लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असून, या सुशोभिकरणाकरिता या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे . देऊ शब्द तो पुरा करू या वचनाप्रमाणे वर्षभरापूर्वी केलेल्या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल समितीकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच कणकवली शहरवासीयांनी देखील नगराध्यक्षांच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हा धनादेश स्वीकारताना पुतळा समितीचे संस्थापक सदस्य आनंद पारकर, कल्याण पारकर, श्री. दिपनाईक, महेश सावंत, माजी नगरसेवक बंडू गांगण, आनंद पारकर, जावेद शेख, श्री. ठाकूर आदी उपस्थित होते.