
सावंतवाडी : इनरव्हील क्लब तर्फे रोटरी पार्क येथे ध्वजारोहणानंतर वीरपत्नी श्रीमती सुप्रिया सुनील सावंत यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे पती सुनील सावंत यांना पंजाब येथे गेल्यावर्षी 2023 सप्टेंबरला वीरमरण आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या वीर पत्नीचा इनरव्हील क्लब तर्फे हृदय सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेसिडेंट डॉ.सुमेधा धुरी, सेक्रेटरी वैभवी शेवडे, खजिनदार पूजा पोकळे, आय एस ओ दर्शना देसाई, एडिटर देवता हावळ, वाईस प्रेसिडेंट शितल केसरकर इनरव्हील मेंबर्स रोटरी मेंबर्स आणि रोटरेक्ट मेंबर्स उपस्थित होते.