
देवगड : भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संघटनेच्या राज्य परिषदेवरील सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील भाजपा नेते माजी आमदार अजित गोगटे यांची निवड झाली आहे. त्याबदल हार्दिक अभिनंदन करताना माजी अध्यक्ष संतोष किजवंडेकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, देवगड जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवामोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटिल, युवामोर्चा पदाधिकारी रविकेश तेली उपस्थित होते.