हिर्लोक -आंबलपाडमधील युवकांच्या दुचाकी कुडाळ बस स्थानकातून चोरीला..!

कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल
Edited by:
Published on: September 05, 2023 13:59 PM
views 255  views

कुडाळ : कुडाळ बस स्थानक व कुडाळ रेल्वे स्थानक या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीला गेल्याच्या घटना मागील आठवड्या भरात घडल्या आहेत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुडाळमधून मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे.या चोरी प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दोघांनी फिर्याद दाखल केली असून हिर्लोक चव्हाणवाडी येथील सुरेश चव्हाण यांनी आपल्या ताब्यातील हिरो होंडा  (एमएच ०७ जे ३५८२) ही मोटरसायकल कुडाळ एस टी स्थानक येथे ३० ऑगस्ट रोजी उभी करून ठेवली आणि ते आजरा येथे आपल्या सासरी गेले आणि ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा ते कुडाळ येथे आल्यावर त्यांची मोटर सायकल मिळून आली नाही त्यांनी शोधाशोध केली त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली.

तर आंबडपाल येथील अभिषेक सावंत यांनी आपली मोटर सायकल हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच ०७ यु ८०३०) ही रेल्वे स्थानक येथे उभी करून त्या ठिकाणी असलेला डंपर घेऊन ते कामावर गेले जेवणाच्या मधल्या सुट्टीमध्ये ते रेल्वे स्थानक येथे आले होते त्यावेळी मोटरसायकल होती मात्र संध्याकाळी पुन्हा डंपर घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी मोटरसायकल अजून आली नाही ही घटना २ सप्टेंबर रोजी घडली याबाबत त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दोन मोटरसायकल चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात पुडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.