मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात हिर्लोक शिवाजी विद्यालय प्रथम

आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 25, 2024 12:46 PM
views 134  views

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा- दोन या अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३२ माध्यमिक शाळांच्या गटातून शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कुलने प्रथम क्रमांक प्राप्त करत ११ लाखाचे बक्षीस पटकावले आहे. त्याबद्दल सोमवारी हिर्लोक विद्यालयामध्ये अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले आमदार वैभव नाईक यांनी विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व  शिवाजी विद्यालय मधील शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्गाचे अभिनंदन केले आहे. यावेळी प्रशालेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.  

याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले  विद्यार्थी व पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओघ असताना माध्यमिक शाळा चालविणे तेवढे सोपे नाही. मात्र हिर्लोक हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असून येथील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.त्यामुळेच हि शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून माझ्या मतदारसंघातील शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याचा मला अभिमान आहे. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांनी  शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, हिर्लोक सरपंच प्राची सावंत, माजी सरपंच कन्याश्री मेस्त्री, कुसगाव गिरगाव सरपंच सौ. सावंत,संतोष कदम,शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदय सावंत, खजिनदार बाजीराव झेंडे, सह सेक्रेटरी पंढरीनाथ सावंत,संचालक सुभाष सावंत,मुकुंद सरनोबत,मंगेश परब,रवींद्र सावंत, हिर्लोक ग्रा. प.सदस्य सारिका माने, सदस्य अक्षता मेस्त्री, सदस्य विलास सावंत, अमित राणे, सज्जन सावंत,  संदीप सावंत,राकेश राणे,संदेश आरेकर,एकनाथ सरनोबत,समीर सावंत,तेजस सावंत,शामराव जाधव, गिरगाव शाखा प्रमुख महेश गुरव पद्मनाब गुरव, संजय आचरेकर,विनोद सावंत, महादेव केळवे, विजय परब, मुख्याध्यापक दिनेश म्हाडगूत,शिक्षक सुभाष विणकर,स्मिता घाडी,मनीष तांबे,अनिल केळुसकर,केशव ठाकरे,मंगेश शिंदे,स्वरा राऊळ, सुशील डवर,हनुमंत नाईक शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानेश्वर गोसावी,महादेव जाधव यांसह हिर्लोक गावातील  ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.