हिंदूंनो आता तरी जागे व्हा : सीताराम गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2025 14:07 PM
views 221  views

सावंतवाडी : पहलगाम (जम्मू काश्मीर) मध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून या घडलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे. तुमचा धर्म कोणता असे विचारून हिंदू म्हणून सांगितल्यावर गोळीबार करण्यात आला. प्रत्येक हिंदूने याचा गांभीर्याने विचार करुन हिंदू धर्म पाळुन त्याच्यासाठीच जगुया व इतरांना न वाढवता हिंदू धर्म वाढूवया हीच खरी मरण पावलेल्यांना श्रद्धांजली ठरेल असे सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काश्मिर पहलगाम येथे गेलेल्या हिंदू पर्यटकांना टीपून त्यांना त्यांचा धर्म विचारून नंतर मारण्यात आले. याचा प्रत्येक हिंदूने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, आपण कोणाकडून काय घेतो? काय देतो? कोणत्या रिक्षेत बसतो, कोणत्या हाॅटेलात खातो ते धर्म न विचारता नाव विचारून विचार करणे गरजेचे आहे असे सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.

आता प्रत्येक हिंदूने जागा होऊन धर्म रक्षण करणे काळाची गरज आहे. यासाठी युवा पिढीने पुढाकार घेत धर्म रक्षण व स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत असे मत सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.