
सावंतवाडी : दाणोलीचे संत 'श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज' यांचे चरित्र लेखक श्री र. ग. वायंगणकर यांनी लिहिले आहे. ते अत्यंत लोकप्रिय आहे. आता या चरित्राचा हिंदी अनुवाद श्री सुधांशु लोकेगांवकर (शिर्डी) यांनी केला आहे.
नरेंद्र नांदुरकर (पुणे) यांनी अनमोल प्रकाशन तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. मंगळवार 4 मार्च ला या पुस्तकाचे प्रकाशन श्री समर्थ साटम महाराज मंदिरात केले जाणार आहे. श्री महाराजांना हे पुस्तक अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जाणार आहे. श्री समर्थ साटम महाराज यांच्या चरित्र श्री वायंगणकर यांनी लिहिले. त्यानंतर आता त्याचे हिंदीमध्ये त्याचा अनुवाद त्यात आला आहे. त्यामुळे आता श्री समर्थ साटम महाराज यांचे चरित्र हिंदी मधूनही सर्वत्र उपलब्ध होणार आहे. भक्तांसाठी हिंदीमध्येही महाराजांचे चरित्र वाचायला मिळणार आहे.