सावंतवाडी : लोकनेते दिवंगत भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्ष २०२३ - २४ अंतर्गत राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेज सावंतवाडी इथं हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॉलेजचे मुख्याध्यापक धोंड सर उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, प्रा. प्रवीण बांदेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. माया नाईक, हिंदी विभाग प्रमुख, मराठी विभाग प्रमुख प्रा. पाथरवट सर इतर सर्व शिक्षक, कॉलेजचे जीएस, एल. आर. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमार विकास एका याने केले. यावेळी त्याने हिंदी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांची सुरुवात स्वागत गीताने झाली.
ऋचा पिळणकर ,युवराज, अनुष्का पावसकर,सोहम नाईक, सर्वेश सावंत यांनी स्वागत गीत सादर केले. तर सेजल परब व पवन गावकर यांनी काव्य सादर केले. रिया पावस्कर, ऋचा पिळणकर, फिलीप फर्नांडिस यांनी गाणी सादर केली. तर तन्वी सावंत हिने एकांकिका सादर केली.
वासिफ मुल्ला याने विनोदी एकांकिका सादर केली. प्रशांत सावंत,अक्षय कटारे कनिष्का सम्राट यांनी वाद्य वादन केले. काव्या फडणीस, श्रावणी रस्सम यांनी कबीर के दोहे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार सिकास एक्का व दीक्षा सामंत यांनी केले. तर कुमारी तन्वी सामंत हिने आभार मानले. यावेळी कुमारी सई कासकर, सायली माडगूत, पुष्पराज सावंत, श्लोक मालवणकर, मांगिरिश गवस, आर्या गावडे, श्रीनिवास जोसलकर, सर्वेश सावंत, मंथन कांबळे, तानिया गावडे या सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.