
सावंतवाडी : सावंतवाडीत कमळाचा उमेदवार नाही. भाजपचे आणि माझं मिशन एकच आहे. त्यामुळे भाजपसह महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांनी मदत करून बदल घडवून आणावा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मी आघाडीतील इच्छुकांना भेटणार आहे. इच्छुक असण गैर नाही. पण, आपलं मिशन एक आहे. त्रास वाचवण्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे. शिवसेनेच्या आमदाराने काही केलं नाही हे जिल्हाप्रमुख देखील बोलले आहेत. त्यामुळे ही चुक आता सुधारायची आहे. दिलेली आश्वासन फसवी निघाली हे सत्य आहे. तसेच माझ्यावर बोलल्याशिवाय आता प्रसिद्धी मिळणार नाही. त्यामुळे हे होतच राहणार असा टोलाही तेलींना हाणला.
मी एकट्याने प्रवेश केला आहे. इथला विकास करणे, रोजगार आरोग्याचा प्रश्न सोडवण हा उद्देश आहे. बदल करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आमदारा बदलावा लागेल. भाजप आणि माझं मिशन दीपक केसरकर आहेत. भाजपसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी हीच विनंती राहील की सूड उगवण्यासाठीची ही संधी आहे. इथे कमळाच्या निशाणीवर उमेदवार नाही आहे. त्यामुळे मला मदत करावी असं आवाहन राजन तेली यांनी केले. यावेळी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.