
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरावर पंधरवडा, दिनांक 22/7/24 ते दिनांक 3/8/2024 या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे हिपॅटायटिस (कावीळ) संदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध जनजागृती पर कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामध्ये नर्सिंग स्कूल, सिंधुदुर्ग च्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरीचे आयोजन केले.
हिपटायटीस संधर्भात जनजागृती होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक घेऊन विद्यार्थ्यांनी फेरीत सहभाग घेतला. तसेच पथनाट्यामधून जिल्ह्यामध्ये बसस्थानके, शासकीय कार्यालय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कॉलेज ऑफ फार्मसी, शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर हायस्कूल इत्यादी ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करून नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याचे काम केले.
रांगोळी स्पर्धा, भित्तिचित्र स्पर्धा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग येथील 25 बंदीवासांच्या रक्ताची तपासणी करून त्यांना स्वच्छतेबाबतचे महत्त्व, योग्य आहार, शरीराची निगा राखणे या संदर्भातील समुपदेशन व मार्गदर्शन जिल्हा रुग्णालयाचे डॉ राजेश पालव यांनी केले. पणजी आकाशवाणी केंद्रामधून कावीळ संदर्भात जनजागृतीसाठी विशेष तज्ञांकडून माहितीचे प्रसारण करण्यात आले.
यावेळी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्याम पाटील, डॉ सुबोध इंगळे, निलेश गावडे,दयानंद कांबळी,जिल्हा कारागृह अधीक्षक श्री लटपटे तसेच नर्सिंग स्कूल येथून श्रीम एस जी म्हाकले, एस एस आंबेरकर, एच आर प्रभू, श्रीम पी पी गायडोळे, श्रीम जी जे झोरे, बी आर गिरी, राजेश पारधी, सुनील धोणुकशे, समीर तडवी, राजाराम फाळके इत्यादी उपस्थित होते.जागृती फाउंडेशन ,कोकण कला शिक्षण विकास संस्था आणि ओरोस पोलीस ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कावीळ आजाराची तपासणी व औषधोपचार मोफत मोफत करण्यात येतात तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले