
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन आणि दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने गावातील विकास सोसायटी च्या माध्यमातूनच दूध संकलन करण्यात येणार आहे. तसेच एक गाव एक दूध संस्था असे काम यापुढे केले जाणार आहे. एका गावात दोन दोन दूध संस्था आणि त्यांना गोकुळने कोड देऊ नये, एका गावात एकच दूध संस्था असावी, असे नियोजन यापुढे जिल्हा बँक व गोकुळच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी दिली.
गाई म्हशी खरेदी संदर्भात जून पॅटर्न राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त गाई म्हशी खरेदी करून या जिल्ह्यात गावागावात दूध वाढीच्या दृष्टीने दूध शेतकऱ्यांची दर महिन्याला संयुक्त बैठकही घेण्यात येऊन दूध संस्था व शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व दूध उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी चेअरमन व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांची संयुक्त सभा सोमवारी आज आयोजित करण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेत जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, संचालक रवींद्र मडगावकर, समीर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, गोकुळचे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन रेडकर, विस्तार सुपरवायझर राजेश गावकर, भगवान गावडे, डॉ. प्रसाद देवधर, सावंत तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, कुणकेरी दूध संस्थेचे चेअरमन प्रमोद सावंत, कलंबिस्त दूध संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत, विष्णू तामाणेकर, रवींद्र मापसेकर, अनिल रावळ, दीपक सावंत, दिनेश आंबेडकर राजेश लोट दिलीप सावंत अभय परब अंकुश म्हाडदळकर नामदेव मडव भिकाजी सावंत सुधीर सावंत अमोल तांबे वासुदेव परब सदाशिव परब अनिल शिखरे ज्ञानेश्व परब श्रीकृष्ण भोसले संतोष सामंत विवेक शिरसाट अमित जाधव गणपत परब वामन गाड पांडुरंग ठाकूर बाबुराव कविटकर रविंद्र धावुस्कर खेमा नाईक सुनील गार्ड अशोक गावकर प्रदीप सावंत लक्ष्मण कोठावळे मुकुंद देसाई रामदास भोगले रूपा सावंत ज्ञानेश्वर धुरी अशोक सावंत बाळकृष्ण मढव यशवंत पटनाईक शशिकांत वालावलकर सतीश सावंत संतोष साटम बाबाजी धोंड स्वप्निल सावंत आधी उपस्थित होते यावेळी श्री दळवी पुढे म्हणाले दूध वाढीच्या दृष्टीने जिल्हा बँक शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करत आहे आणि विविध योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. मात्र एका गावात एकच दूध संस्था दूध केंद्र असायला हवे एकंदरीत एका गावात एक दूध संस्था असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे हित होते नाही. तर गावागावात वाड्यावाड्यात दूध संस्था आणि गोकुळ ने कोड देऊ नये .दोन्ही दूध संस्था टिकणे कठीण होईल. त्यासाठी यापुढे एक गाव एक दूध संस्था अशी संकल्पना आपण राबवूया तसेच ज्या गावात विकास संस्था सोसायटी असतील त्या गावांमध्ये विकास सोसायटी संस्थेच्या मार्फत दूध संकलन केल्यास गावामध्ये सहकार आणि शेतकऱ्यांचे हित आहे. त्या दृष्टीने यापुढे नियोजन करूया. तसेच येत्या जूनमध्ये गाई म्हशी खरेदीच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. तंत्रशुद्ध आणि सर्व अभ्यासपूर्ण पद्धतीने दूध संस्था व शेतकऱ्यांनी दूध संकलन करणे आवश्यक आहे. येत्या महिन्यात जिल्हा परिषद व गोकुळ व जिल्हा बँक यांच्यामार्फत 22 जणांना कृत्रिम सेवादाता प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून गावागावात सेवा दाता तयार करण्यात येणार आहेत. आपले दूध चांगल्या प्रतीचे असायला हवे .या दृष्टीने यासाठी दूध केंद्रावर आपण योग्य नियोजन करा तसेच आपण कधीही जिल्ह्यातील कुठल्याही भागात दूध संकलन केंद्रावर व्हिजिट देईन असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉक्टर प्रसाद देवधर यांनी दूध संस्था चेअरमन संचालक व शेतकऱ्यांनी दूध वाढीच्या दृष्टीने व पशुसंवर्धनच्या दृष्टीने अभ्यास करायला हवा आणि दर महिन्याला नवनवीन शिकण्याच्या दृष्टीने दूध संस्था बैठकींना उपस्थित राहणे गरजेचे आहे. यातून नवतंत्रज्ञान आत्मसात होते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध संकलन वाढीच्या दृष्टीने व पशुसंवर्धन च्या दृष्टीने पुस्तक ग्रंथालय उपलब्ध करावे जेणेकरून नवे तंत्रज्ञान समजेल असे ते म्हणाले.
यावेळी व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गोकुळचे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे यांनी दूध संस्थांनी चांगल्या प्रतीचे दूध संकलित करणे आवश्यक आहे. गोकुळच्या माध्यमातून विविध योजना तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा लाभ घ्या असे स्पष्ट केले.
यावेळी डॉक्टर नितीन रेडकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन व प्रतिनिधींनी आपल्या समस्या अडचणी स्पष्ट केल्या यामध्ये ज्ञानेश परब रवींद्र मापसेकर प्रमोद गावडे पांडुरंग ठाकूर श्री गाड, श्री सामंत एडवोकेट संतोष सावंत आदिने आपल्या समस्या व अडचणी स्पष्ट केल्या.