सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला एकूण बत्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी ए ग्रेडमध्ये, सोळा विद्यार्थी बी ग्रेड मध्ये तर नऊ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले.