वायंगणीतील हेल्प ग्रुप फाउंडेशनमुळे वृद्ध महिलेचं घर झालं प्रकाशमय

Edited by: दिपेश परब
Published on: February 01, 2024 10:33 AM
views 142  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले तालूक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील तळेकरवाडी येथील झोपडी वजा घरात एकटी राहणारी वृद्ध महिला श्रीमती काशिबाई साबाजी गोवेकर हिच्या घरात गेली अनेक वर्ष वीज नव्हती. त्या रॉकेलच्या दिव्यावरच आपलं जीवन जगत होत्या ही माहिती हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी यांना कळताच फाउंडेशनच्या वतीने तिच्या घरामध्ये संपूर्ण खर्चासह मीटर डिपॉझिट, फिटिंग, सर्विस वायर, अशा सर्व खर्चासकट विद्युत जोडणी करून त्या वृद्ध महिलेच घर प्रकाशमय केलं.

    यावेळी विद्युत वितरणचे अधिकारी वाघमोडे, हेल्प ग्रुप फाउंडेशन चे अध्यक्ष सुमन कामत, प्रवीण राजापूरकर, सुनील नाईक, शेखर तोरस्कर, उल्हास कामत, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, सिद्धेश कोचरेकर, अरुण आरोलकर आदी सदस्य उपस्थित होते. तसेच माजी सरपंच श्यामसुंदर मुणनकर, सुभाष मेस्त्री, भाई भगत, संदीप पेडणेकर, वायरमन मंगेश धोंड, निलेश मुणनकर, रितेश तांडेल, परेश पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  या विद्युत मीटर जोडणीसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सुमन कामत आणि प्रवीण राजापूरकर यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी विद्युत वितरणचे  अधिकारी वाघमोडे यांनी हेल्प ग्रुप फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले.