बांदा गडगेवाडीतील महापुरुष मंदिराच्या दुरुस्तीसाठी दीपक केसरकर मित्रमंडळाकडून मदत..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 16:16 PM
views 226  views

सावंतवाडी : बांदा येथील गडगेवाडी महापुरुष मंदिरावर झाड पडून मंदिराचे नुकसान झाले. या मंदिराच्या दुरुस्तीसाठी दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. यातून मंदिराची दुरुस्ती शक्य तितक्या लवकर करण्यात येईल यासाठी ही मदत केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, मकरंद तोरसकर, बांदा शिवसेना विभागप्रमुख राजेश विर्नोडकर, पांडुरंग नाटेकर, भैया गोवेकर, संदेश पावसकर,नंदू शिरोडकर, साई कल्याणकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर व इतर उपस्थित होते.