पोंभुर्लेत वारस तपास शिबिर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 16, 2025 15:26 PM
views 146  views

देवगड : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे गुरुवार 17 रोजी वारस तपास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या जिवंत 7/12 मोहिमेंतर्गत मौजे पोंभुर्ले व मालपेवाडी येथील मयत खातेदार यांचे वारस तपास करणेसाठी गुरूवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय पोंभुर्ले येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा तसेच मयत खातेदार यांच्या वारसांनी येताना मयताचा मृत्यू दाखला,अर्जदार यांचे 2 फोटो व आधारकार्ड घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, तलाठी सुनीता मेस्त्री यांनी केले आहे.