कणकवली शेतकरी संघासाठी चुरशीचे मतदान..

आमदार नितेश राणे यांनी देखील रांगेत राहून बजावला मतदानाचा हक्क
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 07, 2023 17:07 PM
views 376  views

कणकवली : कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूकीसाठी शनिवारी सकाळी पासूनच मतदान मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत होत आहे.शेती सहकारी संस्था गटात ३७ ,संस्था मतदारसंघातून १९ असे १०० टक्के मतदान झाले आहे.तर अन्य गटातील ८२१ मतांपैकी ६३९ मतदान झाल्याने
७७.८३ टक्के मतदान झाले आहे.१५ पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १४ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात असून सकाळी ८ ते ४ या वेळेत कणकवली पंचायत समिती जुनी इमारत येथे मतदान झाले आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी देखील रांगेत राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे

आता प्राथमिक शेती सहकारी संस्था ७ जागांसाठी १३ उमेदवार, इतर प्रकारच्या संस्था १ जागेसाठी २ उमेदवार, व्यक्ती सदस्य प्रतिनिधी २ जागेसाठी ४ उमेदवार,महिला प्रतिनिधी २ जागांसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्ग १ जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून भाजपचे गणेश तांबे हे बिनविरोध झाले आहेत. १४ जागांसाठी भाजप- शिंदे गटाचे १४ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १३ उमेदवार रिंगणात आहेत.

प्राथमिक शेती सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप- शिंदे गटाकडून किरण गावकर, सुरेश ढवळ, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट व प्रशांत सावंत असे सात उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दीपक कांडर, रावजी चिंदरकर, राजेंद्र राणे, संजय रावले, रविकांत सावंत व राजेंद्र सावंत असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. 

इतर प्रकारच्या संस्था मतदारसंघातून एका जागेसाठी शिंदे गटाचे मिथील सावंत व शिवसेनेचे श्रीकांत राणे यांच्यात थेट लढत होत आहे. व्यक्ती सदस्य प्रतिनिधी गटातून भाजपचे प्रकाश सावंत, गुरूप्रसाद वायंगणकर व सेनेचे प्रकाश घाडीगावकर व सुभाष सावंत यांच्यात थेट लढत होत आहे. महिला प्रतिनिधीसाठी भाजपच्या लीना परब, स्मिता पावसकर व सेनेच्या स्वरूपा विखाळे, सुधा हर्णे यांच्यात लढत होत आहे. इतर मागास प्रवर्गातून भाजपचे सदानंद हळदिवे व शिवसेनेचे उमेश वाळके यांच्यात लढत होत आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपच्या विनीता बुचडे व सेनेचे जयेश धुमाळे यांच्यात लढत होत आहे.आ.नितेश राणे यांनी रंगीत राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.