मालवणात जोरदार पाऊस..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 28, 2023 11:46 AM
views 503  views

मालवण : ऐन गणेशोत्सवात सुरु झालेल्या पावसाने गेले दोन दिवस मालवणात जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. आजही पहाटे पासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागानेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज दिवसभर पाऊस असाच राहिल्यास आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन भर पावसात होणार आहे. 

ऐन गणेशोत्सवात म्हणजे चतुर्थीच्या तिसऱ्या दिवसापासूनच मालवणात पावसाच्या अधून मधून सरी कोसळत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले होते. मात्र, पावसामुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. आज चतुर्थीचा दहावा दिवस आहे. अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांचे विसर्जन होणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे भर पावसात आज बाप्पांचे विसर्जन होणार आहे.