
देवगड : देवगडात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतजमिनी बागायती पाण्याखाली गेल्या असून वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे.पवनचक्की येथे वादळी वाऱ्याचा फटका बसला असून जामसंडे भटवाडी येथील विजय राजाराम भुजबळ यांच्या घराचे शेजारी वीज पडून घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रिक बोर्ड, घराची कौले, वासे यांचे रु.80000 ते 90000 नुकसान झाले आहे.
देवगड मध्ये देवगड मध्ये आज 07 मिमी पावसाची नोंद तर एकूण 733 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. देवगड तालुक्यात गुरुवारी दुपारी एक वाजल्या पासून झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्याच बरोबर सौरपथदीप ही पडले आहेत. वीज यंत्रणेत सातत्याने बिघाड होत असल्याने विद्युत पुरवठा ग्रामीण भागात खंडित झाला होता.तर शहरी भागात देखील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. या मुसळधार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सकल भागातील रस्ते, माड बागायती या ठिकाणी पाणी भरले होते. तर नदी नाले ही दुथडी भरून वाहत होते.काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक देखील काही काळ बंद झाली होती. मृग महिन्यात कोसळणाऱ्या या पावसाने ७३३ चा टप्पा देखील ओलांडला आहे. देवगड तालुक्यात पावसाने हाहाकार केला असून गुरुवारी दुपारपासून झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतःविस्कळीत झाले आहे.
पावसामुळे वीजपुरवठा पूर्णता खंडित झाला होता. देवगड मध्ये दुपारपासून झालेल्या या पावसात अनेक ठिकाणी पावसाची पाणी तुंबल्याने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा झाला होता. ठिकठिकाणी सकल भागातील रस्ते कॉजवे देखील पाण्याखाली गेले होते. मिठमुंबरी, कोटकामते, खुडी, वाडा नारिंग्रे, मिठबाव, हिंदळे, बापर्डे, तिर्लोट, पुरळ आदी भागातील शेतजमिनी माड बागायची पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.