
देवगड : तालुक्यात ऊन तापत असताना काही दिवसापासून ढगाळ वातावरण राहत होते. 21 एप्रिल रोजी सायंकाळी मेघगर्जनासह वादळी पाऊस तालुक्यात ठीक ठिकाणी झाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांची तारांबळ उडाली. याचाच फटका गढीताम्हाणे मधली वाडी येथील यशवंत विश्वास कदम यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली. तर हनुमान कदम यांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे देवगड तालुक्याचा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते. मेघा गर्जना सह वादळी जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने गढिताम्हाणे मधली वाडी येथील यशवंत कदम यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाचे झाड आगीच्या भक्षस्थानी पडले. तर हनुमंत कदम यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली असल्याचे बोलले जात आहे. अन्य भागात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.मात्र अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठीच तारांबळ उडाली.