
सिंधुदुर्ग : अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत (जवळपास सहा सबस्टेशन : मालवण, आचरा, कुंभारमठ, वेंगुर्ला, माणगाव, पेंडुर) वीजखंडीत झालेली असून ती पूर्ववत करण्याचे काम MSEB मार्फत सुरु आहे.
सोसायट्याच्या वाऱ्यामुळे सदर कामात अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थिती वेंगुर्ला आणि माणगाव सबस्टेशन वरील पुरवठा पूर्ववत झाला असून उर्वरित मालवण, पेंडुर, आचरा, कुंभारमठ या सबस्टेशन वरील पुरवठा पुढील चार तासांत पूर्ववत होईल असे MSEB कडून कळविण्यात आले आहे.
याबाबत आम्ही सातत्याने MSEB विभागाच्या संपर्कात आहोत, अशी माहिती पालकमंत्री कार्यालयाचे OSD सागर साळुंखे यांनी दिली.