
आंबोली : आंबोलीत पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना घडली आहे. माकडाला एका भरधाव गाडीनं उडवल्यानं या मादीचा मृत्यू झाला. या मादीच्या पोटाशी तीच नवजात पिल्लू मृत आईला बिलगून होतं. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना भविष्यात घडू नये म्हणून शासनाने हायवे वरती ठिकठिकाणी ओवर ब्रिज अंडरपास या वन्य प्राण्यांसाठी केले पाहिजे अशी मागणी निसर्ग अभ्यासक काका भिसे यांनी केली आहे.
एका काळ्या तोंडाच्या माकडाला एका भरधाव गाडीने उडवले. ती गाडी निघून गेली परंतु त्या मादी माकडाच्या पोटाशी एक आठवड्याभराचं पिल्लू होतं जे त्याच्या आईच्या मृत्युपश्चात सुद्धा आपल्या आईला बिलगून होतं. हे दृश्य बघून मन हेलावलं अतिशय दुःख झालं. वेळीच उपाययोजना न केल्यास असे अपघात होतच राहणार आहे. अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना बघणे म्हणजे खूपच दुःखद होते. शासनाने हायवे वरती ठिकठिकाणी ओवर ब्रिज अंडरपास या वन्य प्राण्यांसाठी केले पाहिजे अशी मागणी निसर्ग अभ्यासक काका भिसे यांनी केली आहे. दरम्यान, वन विभागाच्या मदतीने हे माकड ताब्यात घेतल. जंगलमय परिसरातून वाहन सावकाश चालवा जेणेकरून काहीअंशी असे अपघात टाळू शकतो असं आवाहन देखील करण्यात आल.