
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अनास्था कोकणसादनं समोर आणली होती. रिक्तपद, न मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा व रूग्णांची होणारी परवड यातून समोर आणली होती. यानंतर शासनाच्या विरूद्ध संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती. राजकीय नेतेमंडळींनी याची तात्काळ दखल घेतली होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याची जबाबदारी घेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच लक्ष वेधणार असल्याच सांगितलं होतं.
मंत्री केसरकर सावंतवाडीत आले असता त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, मध्यंतरी ज्या बदल्या झाल्या त्यात आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर बाहेर गेले. परंतु, त्या बदल्यात दुसरे डॉक्टर आपल्याकडे आले नाहीत. हा विषय मी कॅबिनेटमध्ये मांडला आहे. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत याबाबत आमची बैठक होणार आहे. चांगले डॉक्टर सिंधुदुर्गात यावेत यासाठी आमचे सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना यश मिळाव अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर सिंधुदुर्ग-रत्नागिरीला आरोग्यदृष्ट्या प्राधान्य देण्यात यावं अशी विनंती देखील सरकारला केली आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.