
सावंतवाडी : पुढील वर्षी 1 जून 2026 रोजी शाळा साळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोसाळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 11वा. पर्यंत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव क्र.1 येथे हे महा आरोग्य शिबीर आहे.
या शिबिरासाठी जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर
डॉ. जी. टी.राणे (प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर (शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. मोनालिसा वजराटकर (शस्त्रक्रिया - स्त्रीरोग तज्ञ), डॉ. नेहा पावसकर -कोल्हे (नेत्ररोग - शस्त्रक्रिया तज्ञ ), डॉ. सौरभ पाटील (अस्थिरोग - शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. प्रियांका कासार _ पाटील (स्त्रीरोग - शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. नितेश साळगावकर (बालरोग तज्ञ ), डॉ. स्वप्नाली साळगावकर (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. चेतन परब (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. दत्तात्रय मडवळ (होमिओपॅथी उपचार), डॉ. राहुल गव्हाणकर (MD आयुर्वेद )
हे डॉक्टर तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच काही विशिष्ट आजाराबाबतीत मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिरात करण्यात येणाऱ्या चाचण्या - ई.सी.जी, रक्तातील साखरेची तपासणी ( डायबेटिस), रक्तदाब तपासणी, नेत्रविकार तपासणी (मोतीबिंदू व तत्सम डोळ्याचे आजार), मूळव्याध -भगेंदर अश्या दुर्धर आजाराची तपासणी, स्त्रियांच्या आजाराची तपासणी (गर्भपिशवी / मासिक पाळी / स्तनाचे आजार अशा संबंधित तपासणी), संधिवात/ आमवात किंवा हाडाच्या कुठल्याही आजार संबंधित तपासणी, लहान मुलांच्या आजार संबंधित तपासणी, इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत.साळगाव पारिसरातील ग्रामस्थानी या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अस आवाहन केलं आहे.