
कुडाळ : महसूल सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ तहसिलदार कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती वर्षा शिरोडकर यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची रक्तदाब, रक्तातील विविध घटकांची तपासणी तसेच ई.सी.जी. (ECG) यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. या उपक्रमात उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांनी स्वतः आरोग्य तपासणी करून शिबिराला भेट दिली.
आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. दत्तात्रय देसाई आणि प्रथा पाटकर (समुदाय आरोग्य अधिकारी), प्रीती कुंभार (स्टाफ नर्स), रागिणी गवंडे (आरोग्य सेविका), भगवान हुमरमळेकर (आरोग्य सेवक) तसेच लॅब टेक्निशियन्स म्हणून श्रीमती गौरी राऊळ आणि कृणाली कदम उपस्थित होत्या.
या शिबिरात तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. एकूण ५७ जणांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. महसूल सप्ताहादरम्यान अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे शासकीय कार्यालयाचे नागरिकांशी असलेले संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळते.