
वैभववाडी : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात बुधवार दि.२४सप्टेंबर रोजी स.९ ते दु.२ या वेळेत महीला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे.
देशभर १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर हा कालावधीत महिला व बालकांसाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबविले जात आहे.या अभियानांतर्गत महीलांंची आरोग्य तपासणी ,उपचार सेवा शिबीर आयोजित करण्यात आली आहेत. वैभववाडी तालुक्यातील महीला व बालकांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात या शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबिरात तालुक्यातील महिला व बालकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांनी केले आहे.